Mind Behind The Camera
चांगला फोटो काढला की अनेक लोकांकडून येणारी कॉमन कंपलिमेंट म्हणजे, “कॅमेरा छान आहे तुमचा”. फोटोग्राफी शिकायला सुरुवात केल्या नंतर पहिल्या दिवशी जे आम्हाला शिकवलं गेलं, ती एक कॉन्सेप्ट, “mind behind the camera”. सोप्या शब्दात सागायचं झालं, तर असं म्हणता येईल की तुम्ही फॉटो काढायला जे equipment वापरता ते महत्वाच आहेच, पण त्याही पेक्षा महत्वाचा आहे तो फोटो काढण्या अगोदर, फोटोग्राफर ने केलेला विचार. हा विचार करण्याचे अनेक पैलू आहेत. उदा. Subject, composition, light इत्यादि. हे पैलू कितीही असले तरी प्रत्यक्षात तुमचा फोटो काय संवाद साधतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं. हा विचार नीट केला असेल तर मोबाईल कॅमेरा मधूनही आपण चांगला फोटो काढू शकतो. त्या साठी चांगला DSLR camera हवाच असे काही नाही. आजच्या लेखा मध्ये सब्जेक्ट अणि त्या अनुषंगाने येणारे composition या बद्दल एका उदाहरणातून आपण समजून घेऊ.
साधारण वर्षभरपूर्वी, मी आणि माझी बायको सुरभी, आम्ही madhe घाट ला गेलो होतो. पावसाळा संपत आला होता. पण तरीही थोडी पावसाची भुरभुर चालू होती. आभाळ भरून आलेलं नसल तरी उन नव्हत. थंड वातावरणात तिथे एका टपरी मध्ये एक माणूस कणीस भाजून विकत होता. तिथल्या गावतलाच असावा तो. त्याला २-३ काणस भाजायला आम्ही सांगितली. तो पर्यंत वेळ काढण्या साठी तिथल्या गावात एक फेरफटका मारावा म्हणून टपरी शेजारच्या गल्लीतून आम्ही आत शिरलो. खरं तर १५-२० घरांच्या वास्तीच ते गाव.गाव कसलं छोटी वाडी म्हणायला हरकत नाही. त्या गल्लीतून आत गेल्या गेल्या तिथल्या आटोपशीर घरांनी मझ लक्ष वेधून घेतलं. त्यातही तिथल्या एका घराने मात्र माझ्या मनाचा ठाव घेतला. त्या घराला दिलेला रंग, तिथलं अंगण बघून मला असा वाटलं की एका भल्या मोठ्या कॅनव्हास वर काढलेल्या एका चित्रा समोरच मी उभा आहे. माझं भान हरपून मी बघत बसलो, ते विलोभनीय चित्रं माझ्या डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत. “अरे ही तर वरकाची खुर्ची आहे!”, मला लागलेली समाधी भंग करत माझी बायको पाठीमागून बोलली. “कोणाची खुर्ची?”, न समजून मी विचारलं. “अरे खेडेगावात न्हाव्याला वारक म्हणतात”,ती उत्तरली. आणि या उत्तरा सरशी माझ्या डोळ्या समोर एक संपूर्ण गोष्ट उभी राहिली आणि मला माझी “फ्रेम” सापडली.
ते त्या गावातल्या न्हाव्याच घर होतं. तिथे एका कोपऱ्यात त्याची जुनाट पद्धतीची लाकडी खुर्ची, एक आरसा होता. तिथे तो केस कपात असणार. असं असून सुद्धा प्रचंड स्वछता होती. शेणानं सरावलेल गडद हिरव्या खाकी रंगाचं अंगण होतं. संपूर्ण घर गुलाबी अणि निळ्या रंगात रंगवलेल होतं आणि त्याला पिवळ्या रंगाचा दरवाजा होता. कोंबड्या ठेवण्या साठी किवा इतर काही वस्तू थेवण्या साठी एक भली मोठी वेताची टोपली होती. एका दोरी वर घरातल्या लोकांचे कपडे वाळत घातले होते. हे सगळ बघून तो स्वच्छता प्रिय न्हावी, अंगण सरवणरी त्याची आई कीवा बायको, त्याची मुल, असा त्याचा संपूर्ण संसार माझ्या डोळ्या समोर उभा राहिला. मला माझ्या फोटो चा सब्जेक्ट मिळाला. फोटो मध्ये यातली कोणतीच गोष्ट वगळण्याचा प्रश्नच नव्हता. मी खरं तर फक्त त्याची खुर्ची आणि आरसा यांचा फोटो पण घेऊ शकलो असतो. पण साधा सरळ, समोरून आणि आय लेव्हल ने घेतलेला अँगेल घ्यायचा मी ठरवला. कारण त्यातून माझ्या डोळ्या समोर नसलेल्या त्या संपूर्ण कुटुंबाची गोष्ट समोर उभी राहत होती. समोर असलेला कोणताही eliment वगळला असता तर ती गोष्ट अपूर्ण राहिली असती. त्या मुळे हा फोटो काढण्यासाठी मी निवडलेल्या सब्जेक्ट नेच मला दिशा दिली. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, एका पेंटींग सारखं दिसणारं ते घर,त्याचे रंग हे मला फोटो मध्ये हवे होते. कारण जे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो त्याच्या जवळपास चा अनुभव फोटो बघताना यावा अशी इच्छा होती. पण हा फोटो मी माझ्या साध्या मोबाईल कॅमेरा ने काढला असल्या मुळे ते रंग पूर्ण पणे उतरले नव्हते. पण editing मध्ये तो बदल करता येईल हे माहीत होतं. त्या मुळे editing करताना आपल्याला फायनल रिझल्ट काय हवा आहे हे डोक्यात होतं. पुन्हा एकदा फोटो काढण्या अगोदर केलेला विचार या मध्ये कमी आला. थोडक्यात काय, तर तुमचा कॅमेरा कुठलाही असो, फोटो काढण्या अगोदर सब्जेक्ट चा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच बरोबर आपल्या कॅमेरा च्या लिमिटेशन्स आणि कॅपासिटी हे सुध्दा माहीत असायला हवे. सब्जेक्ट चा विचार इतर अनेक पद्धतीने केला जाऊ शकतो. त्या बद्दल पुन्हा के्हातरी बोलूच.
शुभेच्छा
पंकज हरोलीकर
व्योम स्टूडियोज